लाच घेणाऱ्या महिला सरपंचास एक वर्षे सक्त मजुरी

राजगुरूनगर: कुरण ता जुन्नर येथील अंगणवाडी इमारतीच्या बांधकाम व्यवसायिकाकडून सात हजाराची लाच घेणाऱ्या महिला सरपंचाला एक वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षासुनावण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सहाय्यक जिल्हा न्यायाधीश एस एन पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. रंजना दत्तात्रय कोकणे ( वय ४५,रा कुरण, ता जुन्नर) असे शिक्षा झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. गेली तीन वर्षातील लाच लुचपत विभागाच्या कारवाईत प्रथमच शिक्षा झाली आहे.

या खटल्याची माहिती अशी कि, कुरण ता जुन्नर येथील अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी शासनाने साडेचार लाख रुपयांचा निधी सन २०१२ मध्ये मंजूर केला होता. त्यावेळी रंजना कोकणे या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. या बांधकामाच कंत्राट  नारायणगाव येथील अशोक रत्नपारखी यांना देण्यात आले होत. अंगणवाडीचे बांधकाम सुरु असताना ठेकेदाराला काम करण्यासाठी दि.३१ मे २०१२ ला १ लाख ८ हजार रुपये तर दि ११ जून २०१३ रोजी ५० हजार रुपये धनादेशा द्वारे देण्यात आले होते.

त्यानंतर इमारतीवर स्लब टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दीड लाख रुपये मिळण्याची ठेकादार रत्नपारखी यांनी मागणी केली. सरपंच कोकणे यांनी दीड लाखाचा चेक देण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये ठेकेदार यांनी सरपंचाना दिले होते. मात्र स्लब टाकण्यासाठी दीड लाख रुपये अदा करण्यात त्यांनी उशीर केला त्यानंतर ठेकेदार व सरपंच यांच्यात उर्वरित १० ऐवजी ७ हजार रुपये देण्याचे ठरले. यावेळी ठेकदार यांनी पुणे येथे लाच लुचपत विभागाकडे सरपंच लाच मागत असल्याची तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत विभागाने पडताळणी केली. सरपंच लाचेची मागणी करत असल्याचे निषपन्न झाल्यानंतर लाच लुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद सातव व त्यांच्या पथकाने सापळा रचत रंजना कोकणे यांना त्यांच्या राहते घरी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.

या खटल्याचा निकाल शुक्रवारी(३०) रोजी देण्यात आला. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड.अरुण ढमाले यांनी तीन साक्षीदार तपासले. सबळ पुरावाच्या आधारे कोकणे यांना दोषी धरले. लाच लुचपत प्रतिबंधात्मक कायदा कलम ७ प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैद, लाच लुचपत प्रतिबंधात्मक कायदा कलम १३(१)(ड) अन्वये एक वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज एएसआय रवींद्र राजापुरे यांनी काम पहिले

या निकालामुळे लाच घेणाऱ्यामध्ये जरब बसेल

लाच लुचपत विभागाच्या वतीने मोठ्या संख्येने लोकसेवकांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. अनेक खटले न्यायालयात सुरु आहेत. गेली तीन वर्षातील पुणे विभागातील हा पहिलाच निकाल आहे. या निकालामुळे लाच घेणाऱ्यामध्ये जरब बसेल. असे लाच लुचपत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Ajit says

    Mast baatmi

Leave A Reply

Your email address will not be published.