कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीचा बोझा ग्राहकांवर

जीएसटीच्या नव्या दरामुळे रिअल इस्टेटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढेल, मात्र घराच्या किंमती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्‍यताच अधिक असल्याचे काही विकसकांनी बोलून दाखविले. घराची किंमत वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कच्च्या मालावर आकारण्यात आलेल्या करातील बदलामुळे भविष्यात बिल्डरला इनपूट क्रेडिट टॅक्‍सचा लाभ मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्याचा परिणाम घराच्या किंमतीवर होऊ शकतो.

एक एप्रिलपासून लॉंच होणाऱ्या आणि निर्माणधीन घरांवर जीएसटीच्या दरावर घट झाली आहे. परंतु ग्राहकच नाही तर विकासक देखील या नव्या दरावरून संभ्रमात आहेत. काही विकसकाच्या मते, नवीन दर लागू होण्याबरोबरच घराच्या बुकिंगमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. मात्र किंमत कमी होईल, असे वाटत नाही. इनपूट क्रेडिटचा लाभ न घेता जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना कसा द्यावा यावरून रिअल इस्टेट बाजार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मार्चपासून विक्रीत वाढ झाली असून यामागे जीएसटी दरातील घट हे कारण सांगितले जात आहे. तज्ञांच्या मते, दरातील कपातीमुळे खरेदीदारात विश्‍वास आणखी वाढू शकतो. मात्र किंमत कमी होण्याची शक्‍यता नाही. घराच्या किंमती कदाचित वाढू शकतात, कारण विकसकांना कच्च्या मालावर भरलेल्या करापोटी इनपूट क्रेडिटचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात घट होईल, हे सांगणे कठिण आहे. अर्थात नवीन गृहप्रकल्पांचे काम वेगाने सुरू होईल आणि मागणीही वाढेल यात शंका नाही. शेवटी इनपूट क्रेडिटशिवाय दर कपातीचा लाभ ग्राहकांना इतक्‍यात मिळेल, असे वाटत नाही. मात्र दुसरीकडे एक टक्‍क्‍याच्या दरामुळे परवडणाऱ्या घरांना मागणी वाढण्याची आशा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.