कोलकाता – कोलकातातील बेलियाघाटा भागातील एका जीर्ण इमारतीचा काही भाग पहाटेच्या सुमारास कोसळल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.
सुमारे 150 वर्षे जुनी ही इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली, असे पोलिसांनी सांगितले.
या दुर्घटनेत मरण पावलेली ज्येष्ठ महिला, तिचा मुलगा आणि नातू या इमारतीमध्ये राहात होते. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास इमारत पडल्यानंतर हे सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने या सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.
ही ज्येष्ठ महिला जबर जखमी झाली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अन्य दोघा जखमींवर उपचर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.