सूरत: संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात आल्याने अनेकजण बेकार आणि बेघर झाले आहेत अशा परिस्थितीत सुरत शहरातील एका बिल्डरने माणुसकी आणि औदार्याचे प्रदर्शन घडवत बेघरांना आपल्या अपार्टमेंटमध्ये आसरा दिला आहे.
प्रख्यात बिल्डर प्रकाश भलानी यांनी आपल्या रिकाम्या पडलेल्या इमारतीत तब्बल ४२ कुटुंबाना राहण्यासाठी फ्लॅट्स उपलब्ध केले आहेत या बेघर लोकांकडून फक्त १५०० रुपये मेंटेनन्सचे घेतले जात आहेत प्रकाश भवानी यांनी ओलपाडा भागातील उमरा येथे रुद्राक्ष लेक पॅलेस हि इमारत बांधली आहे पण करोनाच्या प्रभावामुळे या इमारतीतीळ फ्लॅट्स खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हे रिकामे फ्लॅट्स बेघर लोकांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
या इमारतीत एकूण ९२ फ्लॅट्स आहेत त्यापैकी ४२ फ्लॅट्स प्रकाश भलानी यांनी लोकांना राहायला दिले आहेत करोनाच्या परिस्थितीमुळे परिस्थितीमुळे बेरोजगार बेघर झालेल्या लोकानाच हे फ्लॅट देण्यात आले आहेत सुरतमध्ये रोजगारासाठी आलेले पण आता रोजगार नसल्याने बेघर झालेल्या लोकांना हे फ्लॅट देण्यामागे प्रकाश भालानी यांची फक्त सहकार्याची भूमिका आहे गरज पडल्यास इतर फ्लॅटही अशाच तर्हेने उपलब्ध करून दिले जाणार आहेत