पिंपरी – बादलीस हात का लावला, अशी विचारणा करीत एका मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण करीत जबर जखमी केले. ही घटना चऱ्होली येथे घडली.
विकास बबन थोरवे (वय 35, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारकु सुदाम पाटोळे (वय 50, रा. पाटोळे वस्ती, चऱ्होली) असे जखमी मजुराचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. 2) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटोळे हे थोरवे वस्ती येथील दत्त मंदीराजवळ बसले होते. आरोपी याने पाटोळे यांना बेदम मारहाण केली.