मेहुण्याने “दाजी’ च्या डोक्‍यात घातला हंडा

पिंपरी – बहिणीसोबत सतत वाद घालणाऱ्या दाजीच्या डोक्‍यात हंडा मारुन त्यांना जखमी केल्याची घटना 24 जून रोजी भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टी परिसरात घडली. संजय श्रीपती शिंदे (वय-39 रा. दत्तवाडी, आळंदी) असे जखमी झालेल्या दाजीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संदीप बबन सोनवणे (वय-26) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शिंदे व त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाल्याने त्यांनी पत्नीला माहेरी सोडले होते. त्यानंतर फिर्यादी संजय व त्यांच्या पत्नीमध्ये फोनवर वाद झाला होता. या वादाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी संजय हे मेहुण्याच्या घरी गेले. त्यावेळी मेहुणा संदीप याने आपल्या दाजीच्या डोक्‍यात हंडा मारुन त्यांना जखमी केले. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.