कलंब समुद्रकिनारी बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले

नालासोपारा: नालासोपारा येथील कलंब समुद्रकिनाऱ्यावर बुडालेले पाचही जणांचे मृतदेह सापडले आहेत. वसईतील दोन कुटुंबातील पाच जण बुडाले होते. 5 जणांपैकी सायंकाळी उशिरा एकाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर रात्रभर शोधमोहीम राबविल्यानंतर मध्यरात्री दोघांचे आणि आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. कांचन गुप्ता, शीतल गुप्ता, प्रशांत मौर्या, नीशा मौर्या आणि प्रिया मौर्या अशी मृतांची नावे आहेत.

नालासोपारा पश्‍चिमेकडील कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जण बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण धुळवडी साजरी केल्यानंतर कलंब समुद्रकिनारी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही कुटुंबातील पाच जण बुडाले होते. स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले. यानंतर स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम राबवित सर्वांचे मृतदेह शोधून काढले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)