सातारा -काळज (ता.फलटण) येथून दोन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या दहा महिन्याच्या बालकाचा त्याच्याच घराशेजारील विहरीत मृतदेह सापडला. या घटनेमुळे अपहरण वाटत असलेला हा प्रकार खूनाचा होऊन बसल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काळज येथून एका दहा महिन्याच्या बालकाचे अज्ञात दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या पुरूष व महिलेलने हे अपहरण केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे सांगणे होते. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू केला होता. वीसहून अधिक लोकांचे पथक तयार करून तपास मोहिम जारी केली होती. मात्र, त्या बालकाचा त्याच्याच घराशेजारी असलेल्या विहरीत मृतदेह सापडल्याने या प्रकाराबाबत सांशकता तर वाढली आहे.