“त्या” चिमुकलीचा मृतदेह सापडला…

७० तासांनी नदी पात्रातील झुडपात आढळला मृतदेह

विनोद मोहिते / इस्लामपूर: लॉकडॉन मधील कंटाळा दूर करण्यासाठी महिलांनी एकत्रित काढलेली ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतल्याचे आज स्पष्ट झाले. “त्या” चिमुकलीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडला. तब्बल ७० तासांनी नदी पात्रातील झुडपात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. जेनिषा भवरलाल पोरवाल (वय ५) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

बुधवारी कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहे येथे हा प्रकार घडला होता. रामलिंग बेटावर खेळणारी मुलगी आईच्या डोळ्यादेखत वाहून गेली होती.

जोरदार पाण्याच्या प्रवाहातून ती वाहत गेली होती. तब्बल ७० तासांनी जेनिषा हिचा मृतदेह सापडला. बुधवारी बोरगाव येथून बोट घेत तरुणांनी शोधकार्य करताना जेनिषा हिने पाठीवर अडकवलेली कपडे असलेली सॅक नदी पात्रात सापडली. मात्र ती मिळून आली नाही. तीन बोटी रेस्क्यू टीमसह सलग तीन दिवस शोध मोहीम करत होती.

बहे (ता. वाळवा )कृष्णा नदीच्या काठावर साहसी तरुणांनी मृतदेह बाहेर काढल्यावर झालेली गर्दी

स्थानिक नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावातील आपल्या मित्र परिवाराला माहिती देत सतर्कता म्हणून नदी काठी शोध मोहीम राबवली होती. जेनिषाचा शोध घेण्यासाठी इस्लामपुरातील ३० हुन अधिक तरुण पोलिसांच्या मदतीने शोध कार्य करीत होते.

शुक्रवारी पहाटे जोराचा पाऊस पडला होता. यामुळे आज शोध कार्य सुरू करायला उशिर झाला होता. बोरगाव, खरातवाडी येथील नदी पत्रात शोध कार्य राबवले होते. बोट घेवून सर्व तरुण जेनिषा हिचा शोध घेत होते. अखेर ती मृत अवस्थेत सापडली. पोरवाल कुटूंबाचे लाल चौक परिसरातील कन्या शाळेजवळ शालिमार कापड दुकान आहे. या कुटुंबातील महिलांसह परिसरातील आठ-दहा महिलांनी एकत्रित येऊन रामलिंग बेट परिसरात छोटी ट्रिप काढली होती. बुधवारी दुपारी सर्व महिला चार चाकीतून बहे येथे गेल्या होत्या.

शोध कार्यातील बोट

बेटावर फिरण्याठी गेल्यावर सायंकाळी साडे चार च्या सुमारास मंदिर परिसरात असणाऱ्या हेलिपॅडजवळ सर्व महिला एकत्रित आल्या होत्या. यावेळी खेळत असणारी  जेनिषा नदीच्या पात्रात पडली. तिने आरडाओरडा केला. पाण्यात मुलगी गटांगळ्या खात होती. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासंगे वाहून गेली. डोळ्यासमोर मुलगी वाहून गेल्याने आईने आक्रोश केला. महिलांनी आरडाओरडा केला पण तिथे कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने महिला घाबरून गेल्या. यातील एका महिलेने हा प्रकार तातडीने पोरवाल कुटूंबाला कळविला. घाबरलेल्या अवस्थेत लाल चौक, गांधी चौक परिसरातील तरुणांनीं रामलिंग बेटावर धाव घेतली होती.

हसत खेळत घरी वावरणारी आपली एकुलती एक मुलगी जेनिषा हिचा मृतदेह आढळल्याने वडील भवरलाल व कुटुंबाने आक्रोश केला. त्यांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सलग तीन दिवस गांधी चौक व लाल चौक परिसरात शोककळा पसरली होती. जेनिषाचा ही येथील विद्यानिकेतन स्कूल मध्ये युकेजीच्या वर्गात शिकत होती.

महिलांची ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.