नगर (प्रतिनिधी) – विहिरीमध्ये तरुण, तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारात ही घटना घडली. अजय सुरेश बडेकर (वय-23) व मानसी भिमा पाचारे (वय-22) असे मयत झालेल्या तरुण, तरुणीचे नावे आहेत.
याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय असून पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करीत आहे.
रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. दरम्यान, विहिरीच्या काठावर तरुणीसह तरुणाच्या चपला आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दुपारी तरुणाचाही मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केल असून अधिक तपास सुरू केला आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अदांज पोलिसांनी व्यक्त केला आहे.