मांडवगण फराटा(प्रतिनिधी) : येथील भिमा नदीच्या पुलाच्या पुर्व बाजूला एका अनोळखी अंदाजे ४० ते ४२ वर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून याबाबत पोलिस पाटील गंगाधर भाऊसाहेब फराटे यांनी पोलिसांना खबर दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि 02 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 07:00 वाजता मौजे मांडवगण फराटा येथे भीमा नदीच्या पुलाच्या पूर्व बाजूला योगेश शिवाजी फराटे यांच्या शेता जवळ भीमा नदीचे पात्राच्या कडेला एक अनोळखी अंदाजे 40 ते 42 वयाच्या महिलेचा पूर्ण सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आला आहे.
सदर महिलेच्या अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज, त्याचेवर काळ्या रंगाची पट्टी असलेले तसेच पिंक रंगाचा परकर, गळ्यात काळ्या रंगाचे मण्याची पोत त्यामध्ये धातूचे दोन वाट्या, हातात हिरव्या मोरपंखी बांगड्या असे वर्णन असून मृतदेह हा भीमा नदीत पाण्याचे प्रवाहासोबत वाहत आला असावा असा अंदाज आहे. त्यानंतर मयताचे पोस्टमार्टेम वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा येथे केल्यानंतर सदर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सदर मयताचे दिलेल्या वर्णनावरून कोणाला काहीएक माहिती असल्यास तात्काळ शिरुर पोलीस स्टेशन- 02138/222139, मांडवगन फराटा पोलीस दूरक्षेत्र 02137-262133 या
नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे, पोलीस कॉन्स्टेबल किरण ढुके, योगेश गुंड, अक्षय काळे हे करीत आहे.