पुणे – देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर लोहगाव विमानतळावर प्रवाशांची होत आहे. दरम्यान, खासगी वाहनांमधून विमान विमानतळावरुन ये-जा करणाऱ्या विमान प्रवाशांकडील बोर्डिंग पास हाच डिजिटल पास म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी पुणे स्पष्ट केले.
करोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील विमान वाहतूक बंद होती. मात्र, अनेक घडामोडीनंतर अखेर 25 मेपासून देशातंर्गत विमान वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर खासगी वाहनाने जावे किंवा यावे लागते. मात्र, शहरात प्रवास करण्यासाठी पोलिसांचा डिजिटल पास आवश्यक असल्याने अर्ज केले जात होते. ही बाब गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यामुळे नागरिकांना होणार त्रास कमी होणार आहे.