नोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सरकारवर टीका

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या चिंताजनक असून सर्वच स्तरातून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीदेखील केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या नियोजनावर टीकास्त्र उगारले आहे. त्यांनी सध्या देशातील अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्‍त केली असून देशाचा जीडीपी 5 वर जाणे ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत ढकलली गेली असल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला. तसेच नोटबंदी आणि जीएसटीच्या नियमांमुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील तिमाहीचा विचार केला तर विकासदर 5 टक्‍क्‍यांवर येवून पोहचला होता जो कीश भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचे वातावरण असल्याचेही सिंह यांनी म्हटले.तसेच उत्पादक क्षेत्राचा विकास हा केवळ 0.6 एवढाच राहिला आहे. तसेच घरगुती वस्तुंच्या मागणीमध्ये निराशा असून विक्रीतील वृद्धी ही मागच्या 18 महिन्यांतील सर्वांत खालच्या स्तरावर गेली असल्याचीही माहिती सिंह यांनी यावेळी दिली. तसेच अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती पाहुण गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here