मुलींवर चांगले संस्कार करा म्हणणारा भाजप आमदार पुन्हा बरळला

बलिया – कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे विदेशी मानसिकतेचे आहेत. तसेच ते दुहेरी व्यक्‍तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशातील राष्ट्रवादी नेत्यांकडून राष्ट्रवाद आणि देशाची संस्कृती शिकून घ्यावी असे वक्‍तव्य उत्तर प्रदेशातील एका भाजप आमदाराने केले आहे.

मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींवर योग्य संस्कार केले तर बलात्काराचे प्रकार होणार नाहीत असे वक्‍तव्य सुरेंद्रसिंह यांनी आधी केले होते. त्यांच्या वक्‍तव्याला राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर आक्षेप घेतला होता.

त्यांच्या या वक्‍तव्यातून संघाच्या पुरुषप्रधान चातुर्वर्णाचीच संस्कृती दिसून येते. पुरुष बलात्कार करतात पण मुलींनी मात्र संस्कार मूल्ये जपायची असतात ही विचित्र शिकवण संघाची आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे उद्‌गार काढले आहेत.

ते म्हणाले की, राहुल गांधी यांना भारतीय संस्कृतीची जराही कल्पना नाही. ते दुहेरी व्यक्‍तिमत्त्व असून त्यांची मानसिकता पूर्णपणे विदेशी आहे. भारतीय संस्कृतीचा गाभा त्यांना समजणार नाही, अशी पुष्टीही या आमदार महाशयांनी जोडली आहे.

राहुल आणि प्रियांका यांचे दुहेरी व्यक्‍तिमत्त्व ते हाथरसला पीडित परिवाराला भेटायला जाताना दिसून आले आहे. तेथे जाताना ते हसत होते आणि पीडितेच्या घरात मात्र ते अश्रू ढाळत होते. आपल्या मुलांच्या अनैतिक वर्तनाकडे त्यांच्या पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे त्याशिवाय अनैतिक प्रकारांना आळा बसणार नाही, अशी टिप्पणी करीत त्यांनी आपल्या आधीच्या वक्‍तव्याचेही समर्थन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.