राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप आघाडीवर 

पुणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये भाजप उमेदवार कांचन कुल यांनी १५२७८ मतांनी आघाडी घेतली आहे.

कांचन कुल यांनी १५२७८  मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी  १०५९८ मते मिळाली आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तगडे आव्हान म्हणून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देवून यशस्वीखेळी खेळली असल्याचा प्रत्यय येत आहे. मतदार संघांचे अंदाज येऊ लागल्यानंतर भाजपचे वर्चस्व स्पष्ट होत असताना बारामतीत कमालीची धाकधुक वाढली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×