तृणमुलच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये आमच्या राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली जात असून आम्हाला तेथे आमच्या पक्षाचा प्रचार करण्याचा लोकशाहीतील मुलभूत अधिकारही बजावला दिला जात नाही अशी तक्रार भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भाजपच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज आयोगाला तृणमुल सरकारच्या लोकशाही विरोधी भूमिकेविषयी निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, एस. एस. अहलूवालिया, कैलास विजयवर्गीय, भुपेंद्र यादव, मुकुल रॉय या नेत्यांचा समावेश होता. त्यांनी आयोगाच्या निदर्शनाला आणून दिले की काल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरच्या लॅंडिंगालाही तेथील सरकारने अनुमती दिली नाही.

निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की पश्‍चिम बंगाल मध्ये भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तृणमुल नेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच ते आमच्या सभांना आणि प्रचार कार्याला परवानगी देत नाहीत. पण त्यांच्या या लोकशाही कृतीची निवडणूक आयोगाने दखल घेण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)