जनतेला फसवल्याबद्दल भाजपने माफीनामा सादर करायला हवा होता- जयंत पाटील

मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपने जाहीरनामा सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून याला संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेला फसवल्याबद्दल जाहीरनामा सादर करण्याएवजी माफीनामा सादर करायला हवा होता, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, मागील पाच वर्षांत सरकारने देशातील जनतेसाठी कोणतीही विकासकामे केलेली नसून देशातील कामगार, शेतकरी, नोकरदारवर्गात सरकारविरोधीत प्रचंड रोष आहे. सर्वच ठिकाणचे जनमत हे या सेना-भाजपा सरकारविरोधी आहे. देशातील महत्वांच्या संस्थांचे महत्व कमी करत मोदींनी त्यांना वाटत असलेली मुक्त विचारांची भिती देशाला दाखवून दिली. परंतु आजच्या तरूणाईचा आवाज ते दाबू शकत नाहीत. त्यांना मतदानाच्या माध्यमातून उत्तर देत या सरकारला हद्दपार केल्याशिवाय हे तरूण स्वस्थ बसणार नाहीत

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.