नेवासा (प्रतिनिधी) – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांचा ७० वा वाढदिवस शनिवार (दि.१३) रोजी नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी भूषण ह.भ.प.मच्छिंद्र महाराज निकम हे होते. काही आठवड्यापासूनच साहेबराव घाडगेपाटील यांच्या वाढदिवसाची त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात जय्यत तयारी चालू होती. यानिमित्ताने तालुकास्तरीय टेनिस बॉल स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्यामध्ये हस्ताक्षर, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २७ दात्यांनी रक्तदान केले.
१३ जुलै हा त्रिमुर्ती पब्लिक स्कुलचाही स्थापना दिन असल्याने पब्लिक स्कूलचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त सकाळी ७ वाजता घाडगेपाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यदायी जीवनासाठी महाध्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी ९.०० वाजता पैस मंदिर परिसरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.भगवान दत्तात्रयांच्या मंदिरासमोर ७० दिवे प्रज्वलीत करण्यात आले हाेते. संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुमतीताई घाडगेपाटील यांच्यासह पाच सुवासिनींनी साहेबांचे औक्षण केले. तसेच संस्थेचे सचिव मनीष घाडगेपाटील यांनी सपत्नीक त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहलदिदी चव्हाण – घाडगेपाटील, संस्थेच्या विश्वस्त सौ.अनिताताई गाढवे, प्राचार्य सोपानराव काळे, सचिन कर्डिले, अरविंद देशमुख, डीएड – बीएडच्या समन्वयक डॉ.अनुराधा गोरे, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य जितेंद्र पाटील, वित्त व्यवस्थापक अनिता जाधव, संजयसिंह चौहान, राजेंद्र कात्रस, अरुण डोळसे,श्री कांबळेसर,संतोष राऊत,अशोक कानवडे, शिवाजी झांबाडे, मेजर परमेश्वर कसाळ, एकनाथ कापसे, मिलींद सोनवणे, बाबासाहेब तांबे, संतोष निंबाळकर, गोरक्षनाथ वराळे, उमाजी जंगले, बाळासाहेब साबळे, नामदेव ताके, कार्यालयीन अधीक्षक किरण शिंदे, योगेश भवर, बाळासाहेब काळे, संदीप वाकळे, शरद चनघटे, लक्ष्मीनारायण जोंधळे महाराज, छायाचित्रकार अरविंद बोरुडे, सर्व खेळांचे प्रशिक्षक अभिजित दळवी, संभाजी निकाळजे, महादेव काकडे, छबूराव काळे, अशोक पानकडे, संदीप वाघमारे, मुकेश जाधव, सिद्धार्थ सरोदे, गणेश शिंदे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेतील सर्व विभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देशमुख व बापूसाहेब औताडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिन कर्डीले यांनी केले तर प्राचार्य सोपान काळे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.