fbpx

रोममध्ये हिरव्या रंगाच्या कुत्र्याचा जन्म

रोम – इटलीतील रोम शहराच्या उपनगरात राहणाऱ्या क्रिस्टेन मलोकी या शेतकऱ्याच्या फार्महाऊसमधील ८ कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने चक्क हिरव्या रंगाच्या कुत्र्याच्या पिलाला जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्पेलींचा नावाच्या या कुत्रीने जन्म दिलेल्या ७ पिलांपैकी फक्त एका पिलाचा रंग हिरवा होता. या शेतकऱ्याने या पिलाला पिस्टचीनो असे नाव दिले आहे इतर सर्व पिलांचा रंग मात्र पांढरा आहे.

अर्थात या कुत्र्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते या पिलांचा हा हिरवा रंग फार काळ टिकणार नाही. हे पिलू जसजसे मोठे तसतसे हा रंग पांढरा होऊ लागेल. क्रिस्टेन मलोकीने बाकी सर्व पिले विकून टाकली असली तरी हिरव्या रंगाचे पिस्टचीनो हे पिलू मात्र स्वतःकडेच ठेवले आहे.

सध्याच्या करोनाच्या संकटाच्या काळात हिरवा रंग हा आशेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असल्याने या पिलाला मी सांभाळणार आहे असे त्याने म्हटले आहे. पिस्टचीनोला पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलेले मला पाहायचे आहे असे तो म्हणतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.