बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकचा चांगलाच ट्रेंड सुरु आहे. 2018 – 19 या वर्षात बॉलीवूडमध्ये आलेल्या बायोपिकमुळे गाजले. अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि संजू या दोन्ही मोठ्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. त्याशिवाय हॉकीपटू संदीप सिंहवर आधारीत सूरमा आणि नंदिता दास दिग्दर्शित मंटो या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले होते. यातच आता बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट बनविण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्देशक इम्तियाज अली यांनी मधुबाला यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचे अधिकार विकत घेतले. ‘इम्तियाज अली’ यांनी जब वी मेट, रॉकस्टार, हाईवे आणि लव आज कल सारख्या सुपरहिट सिनेमांमुळे ओळखले जातात.
प्रत्येक सिनेमामध्ये एक वेगळेपण दाखवणायसाठी ‘इम्तियाज अली’ यांना ओळखलं जात. आईकॉनिक सिनेमा मुगले-ए-आज़म अभिनेत्री बेगम मुमताज़ जेहन देहलवी यांना मधुबाला नावाने ओळखले जाते. दरम्यान, मधुबाला यांची बहीण ‘मधुर ब्रज भूषण’ यांनी ‘मधुबाला’ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा ‘करीना कपुर’ यांनी करावा असे म्हंटले आहे.
इम्तियाज अली सध्या ‘लव आज कल’ चा सीक्वल ‘लव आज कल २’ हा सिनेमा बनवण्यामध्ये बिजी आहेत.या सिनेमा मध्ये’ सारा अली खान’ आणि ‘कार्तिक आर्य’न मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.