भारतात मोटारसायकलस्वारांची संख्या मोठी आहे. ते मुख्यतः दैनंदिन प्रवासासाठी बाईक वापरतात. बहुतेकदा असे दिसून येते की बाईकची बॅटरी संपल्यानंतर ती किक किंवा बटन दोन्हीने सुरू होत नाही. अशा परिस्थितीत बाईक मेकॅनिककडे जाण्याशिवाय पर्याय उरात नाही. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. जर तुम्हाला देखील या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल तर काळजी करू नका.
आज आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची बाईक एका सेकंदात सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही मेकॅनिककडे जाण्याची गरज भासणार नाही आणि पैसे खर्च करावे लागणार नाहीत. चला तर मग, बाईक सुरू करण्याच्या त्या खास युक्तीबद्दल जाणून घेऊया.
बाईक बंद पडल्यानंतर आपल्याला एका विशेष तंत्राचा अवलंब करावा लागेल. ‘स्टँड स्टार्ट टेक्निक’ असे या युक्तीचे नाव आहे. बटन आणि किकशिवाय बाईक सुरू करण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. या युक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची बाईक एका सेकंदात सुरू करू शकता.
० जर तुमची बाईक किक आणि सेल्फ स्टार्टने सुरू होत नसेल, तर आधी ती डबल स्टँडवर उभी करा. तुमची बाईक न्यूट्रलमधून बाहेर काढा आणि टॉप गिअरमध्ये टाका. दरम्यान, मोटारसायकलच्या गिअरची काळजी घ्या. त्यानंतर तुम्ही बाईकच्या मागच्या टायरच्या दिशेने बसा आणि गतीच्या दिशेने टायर आपल्या हाताने वेगाने फिरवा. दोन ते तीन वेळा टायर वेगाने वळवल्यानंतर तुमची बाईक लगेच सुरू होईल.
० याशिवाय, तुम्ही बाईकला धक्का देऊन देखील सुरू करू शकता. मात्र यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता असेल, जो मागून धक्का देऊ शकेल. तुम्ही स्टँड स्टार्ट ट्रिकने एकट्याने बाईक सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीची गरज नाही.