नवी दिल्ली : भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. डीजीसीआयने एकूण तीन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीजीसीआयने ही माहिती दिली. यामध्ये कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिला या कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी कोव्हीशील्ड या लसीला ही परवानगी देण्यात आली होती.
#WATCH: Drugs Controller General of India briefs the media on COVID-19 vaccine. https://t.co/0PhAeVzOgC
— ANI (@ANI) January 3, 2021
सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
Vaccines of Serum Institue of India and Bharat Biotech are granted permission for restricted use in emergency situation: DCGI pic.twitter.com/fuIfPQ9i7B
— ANI (@ANI) January 3, 2021
भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला.
A decisive turning point to strengthen a spirited fight! DCGI granting approval to vaccines of Serum Institue of India & Bharat Biotech accelerates the road to healthier & COVID-free nation. Congratulations India. Congratulations to our hardworking scientists & innovators:PM Modi pic.twitter.com/yTcNNXnEeG
— ANI (@ANI) January 3, 2021
आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.