शेअर निर्देशांकांत मोठी घसरण

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या निर्यातीवर आयात शुल्क दुप्पट करण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका युरोपातील निर्देशांक कोसळले. त्याचा संसर्ग भारतीय शेअरबाजारांना होऊन भारतीय शेअरबाजाराच्या निर्देशांकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळपासून कमकुवत होता. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स तब्बल 362 अंकांनी म्हणजे 0.93 टक्‍क्‍यांनी कोसळून 38,600 अंकांवर बंद झाला. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 114 अंकांनी म्हणजे 0.97 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 11,598 अंकांवर बंद झाला.

दिवसभर जागतिक शेअरबाजारातही कमालीचे अस्थिर वातावरण होते क्रुडचे दर तुलनेने कमी म्हणजे 70.30 डॉलर प्रति पिंप या पातळीवर असूनही रुपयाचे मूल्य 18 पैशांनी कमी झाल्यामुळेही शेअरबाजारात विक्री झाल्याचे बोलले जाते. सोमवारी एस बॅंकेचा शहर 5.3 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील यांनाही मोठा फटका बसला. भांडवली वस्तू आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक
2.10 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले.

“अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा जागतिक व्यापारावर परिणाम संभवतो. त्यातच अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क थेट दुप्पट करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितल्यामुळे जागतिक शेअरबाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. त्याचा भारतीय शेअरबाजारावर परिणाम होणे अपेक्षित होते.
-हेमांग जानी, संशोधन प्रमुख, शेअर खान

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.