नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आज देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील कोरोना बाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती नायडू यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असं असलं तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
The Vice President of India who underwent a routine COVID-19 test today morning has been tested positive. He is however, asymptomatic and in good health. He has been advised home quarantine. His wife Smt. Usha Naidu has been tested negative and is in self-isolation.
— Vice President of India (@VPSecretariat) September 29, 2020
नायडू यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांच्या पत्नी उषा यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या स्वतःला अलगीकृत करून घेतलं आहे.