मुंबई – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा ( Remo DSouza ) याला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका ( heart attack ) आला. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली होती.
दरम्यान, रेमोच्या प्रकृतीबाबत पत्नी लिझेलने काही माहिती दिली आहे. रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक असल्याचे लिझेल म्हणाल्या. तसेच रुग्णालयातून रेमोला कधी डिस्चार्ज देण्यात येणार? याबाबत उद्या डॉक्टर निर्णय घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
रेमो यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात बॉलिवूड कोरिओग्राफर धर्मेश, सलमान, कृति महेश आणि अभिनेता आमिर अली गेले होते. यावेळी बोलताना धर्मेश म्हणाला कि, आता रेमो यांची प्रकृती स्थिर आहे. असं तो म्हणाला.