मोठा घातपात टळला! नक्षलवाद्यांनी पेरलेला 30 किलोचा आईडी बॉम्ब निकामी

दंतेवाडा – छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट करण्याच्या उद्देशाने पेरून ठेवलेला 30 किलो वजनाचा आयईडी बॉम्ब शोधून तो निकामी करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा घातपात टळला आहे.

अर्नापुर-निलावया मार्गाच्या ठिकाणी एका प्लॅस्टिक कंटेनर मध्ये हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. सध्या या रस्त्याच्या उभारणीचे काम सुरू आहे.

तेथेच सीआरपीएफच्या पथकाला हा बॉम्ब आढळून आला. तो स्फोटक तज्ज्ञांच्या पथकाने निकामी केला. या भागात केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यामुळे अशी स्फोटके पेरून किंवा बॉम्ब लाऊन घातपात घडवण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न असतो.

त्यामुळे रस्ता उभारणीच्या कामातील मजूरांनाही सध्या तेथे जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.