वॉशिंग्टन – रिहाना, ग्रेटा थनबर्ग अशा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींकडून भारतातील शेतकरी आंदोनलनाला पाठिंबा मिळत असताना आता यावर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे अमेरिकेने स्वागत केले आहे. जगातील बाजारावर नव्या कृषी कायद्यामुळे प्रभाव वाढेल.
अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे अमेरिकेने म्हटले आहे. कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, भारत सरकारच्या निर्णयाचे बायडेन सरकार समर्थन करते. खासगी गुंतवणुकीस नवीन कृषी कायदे आकर्षित करतात आणि शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक बाजारपेठा उपलब्ध होउ शकतात.
भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे अमेरिका स्वागत करते. मात्र त्याच वेळी भारतातील पक्षांतर्गत मतभेदांचे निराकरण व्हायला हवे अशीही अमेरिकेची भूमिका आहे. शांततेत निषेध करणे ही कोणत्याही लोकशाहीच्या भरभराटीची वैशिष्ट्य आहे आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही, असे म्हटले आहे.
एकीकडे अमेरिकेच्या प्रशासनाने कायद्यांना पाठिंबा दिला आहे, तर त्याचवेळी अनेक अमेरिकी सेलेब्रिटींनी भारतातील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारी भूमिका मांडली आहे. अमेरिकन कॉंग्रेसच्या हेली स्टीव्हन्स म्हणाल्या की, नवीन कृषी कायद्यांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई केल्याबद्दल आम्हाला काळजी वाटते. याखेरीज इतरही नेते शेतकरी आंदोलकांच्या बाजूने दिसले. मात्र ट्रम्प प्रशासनाची अधिकृत भूमिका वेगळी असल्यामुळे भारत सरकारला हा काही अंशी दिलासा आहे.