किराणा दुकानदार आणि विक्रेत्यांना अन्नधान्य-किराणाची खरेदी करता येणार
पुणे :- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग रविवारी सुरू राहणार आहे. रविवारीही अन्नधान्य आणि किराण्याची खरेदी शहरातील विक्रेत्यांना करता येणार असल्याची माहिती दि पुना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.
वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपासून लॉकडाऊन पुकारले आहे. या कालावधीत मार्केट यार्डाती भुसार बंद राहणार आहे. उद्या (शनिवारी) हा बाजार सुरू असतो. मात्र, रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. शहरातील किराणा दुकानदार आणि विक्रेत्यांना अन्नधान्य आणि किराणा खरेदी करता यावा, यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही भुसार बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याता आला असल्याचे लोढा यांनी सांगितले.