युतीच्या महारॅलीमुळे हडपसरमध्ये भगवी लाट

“मतदारांच्या हृदयात नाव, फक्त शिवाजी आढळराव’ गाण्यांमुळे वातावरण निर्मिती

हडपसर – गळ्यात भगवी उपरणी, टोप्या घालून शिवसेना-भाजपचे झेंडे घेऊन शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-महासंग्राम महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ निघालेल्या प्रचंड रॅलीमुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ ढवळून निघाला.

दादा, पाटील, ताई धनुष्यबाण! अशी ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांना साद घालत खासदार आढळराव पाटील यांचे परिपत्रक वाटत निघालेल्या रॅलीत “कुणी बी गर्जा, किती बी गर्जा, नाही कुणाला मिळणार भाव, मतदारांच्या हृदयात नाव फक्त शिवाजी आढळराव’ या आकर्षक उडत्या चालीच्या गाण्याने वातावरण निर्मिती केली होती. दुपारी 4 वाजता खासदार आढळराव पाटील यांनी केशवनगर येथील रेणुकामाता मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला प्रारंभ केला. या रॅलीत आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, समीर तुपे, अमोल हरपळे, मारुतीआबा तुपे, उज्ज्वला जंगले, माजी नगरसेवक विजय देशमुख, सुभाष जंगले, अमोल हरपळे, समीर तुपे, संदीप दळवी, के. टी. आरु, ऍड. सत्यजित तुपे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, मारुती ननावरे, गणेश घुले, प्रशांत पोमण, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते. शिवाजी चौक, लोणकरवस्ती, साडेसतरानळी रेल्वे गेट, साधुनानावस्ती, सर्व्हे नं. 103, साडेसतरानळी ग्रामपंचायत, अन्सारी फाटा, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, दिपकनगर, रुकारी पेट्रोलपंप, लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी फाटा, मांजरी फार्म, मोरेवस्ती, राजहंस मित्रमंडळ चौक, भापकरमळा, मांजरी गावठाण, शिवाजी महाराज चौक, गवळीवस्ती, गोडबोले चौक, म्हसोबावस्ती, गवळीवस्ती, बेल्हेकरवस्ती, रेल्वेगेट, ढेरेबंगला, महादेवनगर, नेताजी मंगल कार्यालय या मार्गाने रॅलीद्वारे खासदार आढळराव पाटील यांनी मतदारांशी संपर्क साधला.

या रॅलीत शिवसेना-भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते विशेषत: महिला व तरुणवर्गाचा मोठा सहभाग होता. पक्षनेतृत्त्वाने दिलेल्या आदेशानुसार नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली असल्याचे जाणवत होते. त्यानुसार आमदार टिळेकर, महादेव बाबर आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार आढळराव यांच्या प्रचाराचे नेटके नियोजन करून युतीमध्ये चांगला समन्वय असल्याचा संदेश देण्यात महायुतीचे नेते चांगलेच यशस्वी ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.