पुणे – पुणे हे शहर सर्वोत्तम आणि सगळ्यात वेगळे आहे. लहान शहरांमधील आनंद आणि मोठ्या शहरांतील संधी असे दोन्ही पुण्यात आहे. पुण्यासारखी खूप कमी शहरे असतात, असे हिंदी चित्रपटातील अभिनेते आयुषमान खुराना यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माझ्या प्रवासात खूपच समस्यांना सामोरे जाऊन अनुभव मिळवला आहे आणि हे अनुभव आज लोकांसमोर आणतांना मला आनंद होत आहे. अनोख्या आणि वेगळ्या कथानकांमधून नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. मनात एक योजना करून करियरला योजनाबद्ध पद्धतीने पुढे आणल्यास उंची नक्कीच गाठता येईल. “विकी डोनर’ या चित्रपटापासून सुरुवात झाली.
यशस्वी होण्याची ओढ असल्यामुळेच कामाचे कौतुक झाले आणि त्याने मुख्य प्रवाहातील सिनेमामध्ये आपले नाव मिळाले, असे आयुषमान यांनी नमूद केले. लघुपटाबाबत सांगताना आयुषमान याने सांगितले, “नवीन कथानक आल्यास नक्कीच काम करायला आवडेल. यानिमित्ताने एक वेगळा प्रयोग करायला मिळेल. त्याचबरोबर यासह नवीन प्रकारामध्ये काम करायला नक्की आवडेल.’