घंटागाडीचा झाला “कचरा’;चौदा वाहनांवरील एक कोटी धुळीत

तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या 14 नवीन कचरा वाहतूक वाहनांना आतापर्यंत ठेकेदार न मिळाल्याने ही वाहने गेल्या 9 महिन्यांपासून नगर परिषदेच्या आवारात धूळखात पडून आहेत. तर या वाहनांमधून कचरा वाहतूक न झाल्याने नगर परिषदेला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पूर्वी ही वाहने नगरपरिषदेसमोर उभ्या केल्या होत्या, तर आता ही वाहने नगरपरिषदेच्या मागील बाजूस उभ्या केल्या असून, त्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा व धूळ पडला असून, काही गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत.

यासंदर्भात चौथ्यांदा फेर निविदा देऊनही ठेकेदार मिळत नसल्याने नगरपरिषदेवर नामुष्की ओढवली आहे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राज्य शासनाने कचरा वाहतूक करण्यासाठी महिंद्रा कंपनीच्या 14 पिकअप व्हॅनसाठी 1 कोटी 8 लाख 43 हजार रुपये मंजूर होऊन त्या अनुदानातून बांधणी करून तयार वाहने नगरपरिषदेला मे 2019 मध्ये मिळाली. ही नवीन कचरा वाहतूक करणारी वाहने जून महिन्यात नगर परिषदेच्या आवारात दाखल झाल्या.

ती वाहने चालविण्यासाठी प्रत्येक वाहनांसाठी चालक आणि 1 कर्मचारी यांचा ठेका 29 ऑगस्ट 2019, 26 नोव्हेंबर 2019, 19 डिसेंबर 2019 व आता 28 फेब्रुवारीपर्यंत चौथ्या फेर निविदेची मुदत आहे. अद्यापही कोणत्याही ठेकेदाराने निविदा दिली नाही. त्यामुळे आता 9 महिने ही वाहने धूळखात पडल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.