#LIVE : अमित शाह आणि मोदींना राजकीय क्षितिजावरून हटवा -राज ठाकरे

मुंबई: नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाडनंतर राज ठाकरे यांची मुंबईत तोफ धडाडली आहे. मुंबईतील काळाचौकी येथील सभेत राज ठाकरेंच आगमन झाले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

 • भाषणांमध्ये २,३ दिवसांची गॅप घेतली, म्हणलं मुख्यमंत्र्यांना जरा झोप घेऊ देत. मुख्यमंत्री पण भांबावलेत, त्यांना काही कळत नाहीये की ह्याला कशी उत्तर द्यायची
 • सध्याच्या भाजपचे मूळपुरुष नरेंद्र मोदी हे इतकं खोटं बोललेत की भाजपच्या लोकांनाच कळत नाहीये की ह्याला तोंड कसं द्यायचं
 • ….बरं उत्तर नाहीत म्हणून माझे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडीओ बाहेर काढत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत हे वाट लावत आहेत, म्हणून ह्यांचे वाभाडे काढत आहेत
 • २०१४ च्या निवडणुकांच्या वेळेस चाचा भतीजे के खिलाफ लढाई लढणारे, मोदी सत्तेत आल्यावर शरद पवारांवर बारामतीत जाऊन स्तुती करून आले. पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो असं मोदी म्हणाले होते. ह्यावर भाजपला काय म्हणायचं आहे
 • गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांकडे पाहिलं आणि त्याची तुलना जर२०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं त्यानुसार त्यांना१६५ जागा मिळायला हव्या होत्या पण त्यांना ९९ जागाच मिळाल्या. मोदींच्या राज्यात जर त्यांचा जागा कमी होत असतील तर वारं कधीपासून बदलू लागलंय हे बघा
 • मुकेश अंबानी आणि उदय कोटक हे देशातील अग्रणी उद्योगपती जाहीरररीत्या दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा ह्यांना मतदान करणार आहे म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे हे जर जाहीरपणे सांगत असतील ह्यावरून देशात भाजपचं/मोदींच सरकार येणार नाही हे निश्चित.
 • आणि पाकिस्तनाचे पंतप्रधान सांगत आहेत की भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हायला हवेत. आजपर्यंत असं ह्या देशात काही घडलं नाही, मग नक्की इम्रान खान ह्यांना मोदी हे पंतप्रधान का हवेत? काय नक्की शिजतंय?
 • पाकिस्तान को लव्ह लेटर भेजना बंद कर दो, असं मनमोहन सिंगांना २०१४ च्या निवडणुकांच्या आधी बोलणारे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर, नवाज शरीफना केक भरवून आले. काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना?
 • परवा श्रीलंकेत जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं भांडवल करून नरेंद्र मोदी मतं मागत आहेत. ह्याच मोदींच्या कार्यकाळात सर्वाधिक जवान शहीद झाले.
 • मोदी है तो मुमकिन है म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या फेसबुक पेजवर भाजपच्या लावारीस भक्तांनी एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार केला. हे कुटुंब मी तुमच्या समोर व्यासपीठावर आणत आहे. अशा किती कुटुंबियांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?
 • मेक इन इंडियाचा मोठा सोहळा मुंबईत केला. सरकारी यंत्रणा राबवून एमओयू करण्यासाठी लोकांना शोधून शोधून आणलं गेलं. लोकांच्या कर्जाच्या अपेक्षा किती असल्या तरी आकडे फुगवून खोटे एमओयू तयार केले गेले.आणि हे खोटे आकडे तुमच्यासमोर ठेवले गेले
 • मोदींच्या काळात बलात्कारांची संख्या वाढली. २०१६ मध्ये ३८००० बलात्काराच्या घटना झाल्या. २०१७ ते २०१९ ह्या काळात बलात्काराचे अथवा अन्य गुन्ह्यांचे आकडे देणारा एनसीआरबीचा रिपोर्ट ह्यांनी बाहेरच येऊन दिला नाही.
 • जेट एअरवेज बंद झाली, २० हजार लोकं बेरोजगार झाली. जेट एअरवेज अडचणीत आहे हे पंतप्रधानांना, अर्थमंत्र्यांना कळलं नाही का? मग ती वाचली पाहिजे ह्यासाठी का नाही आधीपासून प्रयत्न केले? कोणाच्या घशात जेट एअरवेज तुम्हाला घालायची आहे?
 • राफेलचं काम अनिल अंबानीला का दिलं गेलं? एचएएल ह्या भारतीय सरकारी कंपनीला डावलून तुम्ही अनिल अंबानीला का काम दिलंत? आणि आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत? आणि हेच देशद्रोहाची आणि देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटणार? मग शरीफना केक तुम्ही केक भरवता मग तुम्ही देशद्रोही नाही का?
 • पुलवामा मध्ये जी दुर्दैवी घटना घडली,त्याची पूर्वसूचना दिली होती, आरडीएक्सचा धोका आहे हे माहीत असून देखील का नाही पुरेशी काळजी घेतली गेली? इतकी भीषण घटना घडल्यावर सुद्धा मोदी रंगबेरंगी कपडे घालून फिरत होते. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर तसूभर दुःख नाही.
 • हे कसले फकीर पंतप्रधान हे बेफिकीर पंतप्रधान

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.