पॅरीस – आपण अनेकदा लॉटरीचं तिकीट विकत घेतो. मात्र त्यातील काहींनाच या लॉटरीचा फायदा होतो. मात्र तुम्ही कधी भिक म्हणून लाॉटरी दिली आहे का? नाही ना. आपण कोणाला भिक देताना पैसे देतो किंवा अन्न देेतो. मात्र एका जुगारी माणसाने भिकाऱ्याला लाॅटरीचे तिकीटं दिली. त्या लॉटरीमुळे चार बेघर असलेले लोक लखपती झाले.
फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे यांनी याबाबत माहिती दिली आहे. भिकमध्ये मिळालेल्या लॉटरीमध्ये त्यांना 50 हजार युरो म्हणजेच 43 लाखांपेक्षा जास्त रुपयांची जॅकपॉटची लॉटरी लागली.
तब्बल 30 वर्षांचे चार माणसं ब्रेस्टच्या वेस्टर्न पोर्ट सीटीच्या एका लॉटरीच्या दुकाना बाहेर भिक मागायचे. त्यांना जेव्हा लॉटरी भिकमध्ये मिळाली आणि त्याची रक्कमही मिळाली तेव्हा त्या चारहीजणांनी वाटून घेतले. त्यांना जेव्हा किंमत कळली तेव्हा ते चकित झाले होते. असं लॉटरीच्या ऑपरेटरने सांगितलं.
ते सगळे बधिर होते. त्यांना पैसे मिळाले नसते तर कदाचित चौघांनाही शहर सोडावं लागलं असतं, असं एका नागरिकाने एएफपीला सांगितलं.