काळ्या रंगाच्या साडीत खुललं ‘सोनाली कुलकर्णी’चं सौंदर्य

सोनालीचे फोटो पाहून फॅन्स म्हणाले अप्सरा आली...

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे.

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

नुकतंच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या साडीत सोनालीच्या सौंदर्याला चार चांद लागले. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

तसेच, सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. याशिवाय सोनाली सिंघम रिटर्न्समध्येदेखील पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.