#TeamIndia : गेल्या वर्षीचे उट्टे यंदाच्या वर्षात भरुन निघणार

नव्या वर्षाचा भरगच्च कार्यक्रम बीसीसीआयकडून जाहीर

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्‍यामुळेगेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात झालेल्या स्पर्धांचे उट्टे यंदाच्या वर्षात भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील भरगच्च कार्यक्रम जाहीर केलाआहे.

करोनामुळे गेल्या वर्षी क्रिकेट ठप्प झाले होते. अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या तसेच काही स्पर्धा लाबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान तर झालेच मात्र, स्पर्धाच सुरु नसल्याने तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना घरातच अडकून पडावे लागले होते. याचे उट्टे यंदाच्या वर्षात भरून निघणार आहे. 

भारताचा कसून सराव …

तिसरी कसोटी काही दिवसांवर आलेली असून त्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. हिटमॅन रोहित शर्माही या सरावात सहभागी झाला असूनटी. नटराजन व शार्दुल ठाकूर यांनीही प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत गोलंदाजीचा सराव केला. या सरावात बुमराहच्या गोलंदाजीचे निरिक्षण करुन शास्त्री यांनी त्याला काही सुचनाही केल्या. बदली कर्णधार अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा यांच्यासह या सर्व खेळाडूंनी फलंदाजाचाही कसून कराव केला.

भारतीय संघ आत्ता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून उर्वरीत दोन लढती अद्याप बाकी आहेत. तिसरी लढत 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत होणार आहे. त्यानंतर चौथी आणि अखेरची कसोटी 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिसबेन येथे होईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात आल्यावर भारतीय संघा इंग्लंडविरुद्ध मोठी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून या दोन्ही संघात प्रथम चार सामन्यांची कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच एप्रिल व मे मध्ये आयपीएल स्पर्धाहोत आहे. त्यानंतर जून-जुलैमध्ये भारताचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी-20 मालिका होईल. त्यानंतर आशिया कपचे आयोजन केले जाणार आहे. कोरना व्हायरसमुळे ही मालिका गेल्या वर्षी स्थगित केली होती.

आशिया कप झाल्यानंतर भारत झिम्बब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका होईल. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर असेल.

यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यानंतर भारतात ऑक्‍टोबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात दोन कसोटी आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.