भोर तालुका डोंगरी व दुर्गम म्हणून ओळखला जातो. भोर तालुक्याचा सर्वांगिण विकास होत असताना मुलांना दर्जेदार शिक्षण बालवयात मिळाले तर भावी काळात सुजाण नागरिक तयार होतील. या भावनेतून पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे येथे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदरणीय पोपटराव सुके यांच्या अथक प्रयत्नातून 2010 मध्ये स्थापन झालेल्या नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना 2016 मध्ये झाली. आज, नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलला शैक्षणिक चार वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच, हे स्कूल पाचव्या वर्षीत पदार्पण करीत आहे.
संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पोपटराव सुके यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही ग्रामीण भागातील शाळा कशी असावी याचे एक आदर्श उदाहरण आहे. ग्रामीण भागातील तळागळातील घटकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिकावीत, अशी इच्छा असते. परंतु, अशा प्रकारे शिक्षण देणारी शाळा परिसरात उपलब्ध नसल्याने या परिसरातील मुलांना सर्वोत्तम शिक्षण संधीच उपलब्ध होत नव्हती. ग्रामीण भागातील पालकांची, मुलांची ही गरज ओळखून पोपटराव सुके यांनी नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंग्रजी शाळा सुरू करून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते, यावर आजपर्यंत अनेक मातब्बरांनी आपली मोहर उमटवित या शाळेचे कौतूक केले आहे.
याकरीता मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व्यवस्थापक तसेच येथील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे.
आजच्या युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. इंग्रजी भाषेला आंतराष्ट्रीय दर्जा मिळाल्यापासून इंग्रजीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. या गरजेतून विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाची गरज भासू लागली व यातून नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना झाली. शैक्षणिक वर्ष 2020-21 इयत्ता 11वी विज्ञान शाखा सुरु होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 11वी विज्ञान शाखाही (इंटिग्रेटेड अभ्यासक्रम) सुरू करण्यात येत आहे. यामध्ये 12वी एच.एस.सी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणे एवढेच उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना छएएढ, गएए, चकढ-उएढ, इत्यादी परीक्षांची परिपूर्ण तयारी करुन घेतली जात आहे. हे या शिक्षण संस्थेचे, शाळेचे मुख्य वैशिष्ठ्य मानले जात आहे.
शाळेची वैशिष्ट्ये….
1. सी.बी.एस.ई. पाठ्यक्रम – स्पर्धेत विद्यार्थी मागे पडू नये याकरीता सी.बी.एस.ई. पाठ्यक्रम राबविण्यात आला.
2. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी खास तासिका (ुशरज्ञ लेरलहळपस)
शाळेतील हा एक खास उपक्रम मानला जातो.
3. क्रीडा विभाग – तालुका, जिल्हा पातळी व विभागस्तरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
4. हॉबी क्लब – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी.
5. ई लर्निंग – प्रत्येक वर्गासाठी सुविधा आहे.
6. गेस्ट लेक्चर – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, करिअर विकासासाठी.
7. ऍबकस तासिका – 5 वी ते 9 वी पर्यंत ऍबकस तासिक.
8. कराटे, टायकोंदो तासिका – स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण.
9. आरोग्य – वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी कॅम्प.
10. बाह्य परीक्षा – विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धीसाठी उपक्रम.
11. शिक्षकासाठी प्रशिक्षण – शिक्षकांसाठीही विशेष उपक्रम.
12. ताणतणाव समुपदेशन – व्याख्यानांतून मार्गदर्शन.
13. सांस्कृतिक कार्यक्रम – सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
ग्रामीण भागातील पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुलांना शहरातील महागड्या शाळेतून इंग्रजी माध्यमातून तसेच स्पर्धात्मक परिक्षांचे शिक्षण देवू शकत नाहीत. केवळ या कारणातून ग्रामीण भागातील मुले स्पर्धेच्या युगात मागे राहू नयेत याकरीता नवसह्याद्री गुरूकुलच्या माध्यमातून ज्ञानदानाचा प्रयत्न करीत आहोत.
– पोपटराव सुके, अध्यक्ष, नवसह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट