पुणे – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनासंदर्भात कामगार आयुक्तांनी सुधारित वेतन आदेश लागू करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला केल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जवळपास दुप्पट होणार आहे.
10 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील लिपिकाचे मूळ वेतन 14 हजार 125, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे 13,420 रुपये होणार आहे. शिपाई आणि सफाई कर्मचाऱ्यांचे 13 हजार 85 रुपये असेल.
पाच ते दहा हजार लोकवस्ती असलेल्या लिपिक कर्मचाऱ्यांना 13 हजार 760 रुपये, पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला 13 हजार 55 रुपये आणि शिपाई व सफाई कामगारांना 12 हजार 715 रुपये मूळ वेतन मिळेल.