बंदी तरीही मार्केट यार्डातील गाळ्यावर फोडले फटाके

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागातील एका गाळ्यावर चक्क फटाके उडविल्याची घटना आज घडली आहे. वाढदिवसानिमित्त हे फटाके उडविल्याची बाजार घटकात चर्चा आहे.

नियमानुसार बाजार समिती आवारात फटाके उडविण्यास बंदी आहे. यापूर्वी बाजार समितीचे प्रशासन बी जे देशमुख यांच्या उपस्थित फटाके उडविणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. या घटनेत कारवाई होणार का? याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

याविषयी फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे म्हणाले, संबंधित आडत्यावर कारवाई करून त्याचा परवाना निलंबित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.