बालिकाश्रम रस्त्यालाही अतिक्रमणांचा विळखा

नगर – नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्या वर दुतर्फा वाहने उभी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे याबाबत मनपा प्रशासनाने रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .

गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांनी बालिकाश्रम रस्त्याच्या कामासाठी महानगर पालिकेकडे पाठपुरावा करून रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले परंतु रस्ता होऊनही नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे लक्ष्मी उद्यान न्यू आर्टस कॉलेज पाठीमागे तसेच रस्त्यारस्त्यांवर उसाची वाहने उभी केली जातात.

त्यामुळे ग्रीकांना जा-ये करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे बालिकाश्रम रत्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी क्‍लासेस सुरू असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त आहे तसेच मनपा प्रशासनाने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी साठी रस्ता खुला करुन द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे गेल्या कित्तेक वर्ष पासून बालिकाश्रम रस्त्याची दुरवस्था होती प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु रस्त्यावरील अतिक्रमणे वाढल्यामुळे नागरिकांसाठी मोठी कसरतच करावी लागत लागत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.