आई म्हणायची अपशब्द वापरणे ही वाईट गोष्ट …

स्वरा भास्कर आपल्या सिनेमापेक्षा आपल्या वादग्रस्त विधानामुळेच अधिक चर्चेत असते. आपल्या हटके आणि बिन्दाज अंदाजाने ती नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असते. यातच बालदिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटची चर्चा सध्या चांगली चर्चेला आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला एका 4 वर्षीय मुलाला अपशब्द वापरल्या संदर्भातले आहे. ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलर्सला तिने बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.


स्वर भास्कर ट्विट केले आहे की,’‘बालपणीची सर्वात मोठी आठवण म्हणजे आई म्हणायची शिवी देणं ही वाईट गोष्ट असते. मला हे आता समजलं. सर्व लहान मुलांना प्रेम आणि आदर.’ या ट्विट द्वारे स्वराने तिला #SwaraAunty हा हॅशटॅग  वापरत ट्रोल करणाऱ्या युजर्सला ट्विटद्वारे उत्तर दिले आहे.

तत्पूर्वी, स्वराने काही दिवसांपूर्वी‘सन ऑफ एबिश’ चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये एका बालकलाकाराबद्दल बोलताना स्वरानं अपशब्द वापरल्याचं दिसत. हा किस्सा स्वराच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला आहे. त्यावेळी ती जाहीरातींसाठी काम करत असे. यावेळी अशाच एका जाहीरातीच्या शूटिंगच्या वेळी स्वराला एका 4 वर्षाच्या लहान मुलानं आंटी म्हटलं होतं. ज्यामुळे तिला त्याचा खूप राग आला होता.

 

View this post on Instagram

 

As people who work in show biz and the glamour industry, I think its very important to be aware that the fashion industry is one of the major contributors to industrial pollution in this world. With the current climate crisis, I think all of us can do our small bit, to conserve our resources in the personal choices we make. Recycling and up cycling old clothes is one such means.. I am trying to do the same by up-cyclying one of my beloved late nani’s old saris into a pant suit. It’s special because it holds sentimental value and its a small attempt towards conservation on our planet and encouraging recycling and upcycling. Styled by: @dibzoo Shoes: @papadontpreachbyshubhika Jewellery: @mohabygeetanjali Make up: @saracapela Hair: @rupali.dhumal Pics: @shivamguptaphotography Moral support: @sanjeevinisingh #bestteamever ❤️ #doourbitfortheenviroment #doourbit #fashioncanbebigger

A post shared by Swara Bhasker (@reallyswara) on

यापूर्वीही स्वरा अनेकवेळा आपल्या बिनधास्त वक्‍तव्यांमुळे अडचणीत आली आहे. ट्‌विटरवरच्या प्रत्येक हॅशटॅग कॅम्पेनमध्ये ती सहभागी होत असते. आताच्या आपल्या ट्‌विटवर झालेल्या ट्रोलिंगवरून मात्र तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.