लाचखोर ग्रामपंचायत शिपायास रंगेहात अटक

संगमनेर – प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावरगाव तळच्या ग्रामपंचायत शिपायास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. प्रेमदीप बादशहा नेहे (वय-32, रा. सावरगाव तळ) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावातील 42 कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. झुंबरबाई थिटमे यांना घरकुल बांधकामासाठी यापूर्वी 2 धनादेश काढल्यापोटी आणि पुढील काम करण्यासाठी नेहे याने तक्रारदाराकडे 17 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे झुंबरबाई थिटमे यांचा मुलगा राहुल गोरक्षनाथ थिटमे यांनी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत विभागाने ताबडतोब सापळा रचून आरोपी, संगमनेर लोणी रस्त्यावर गणपती मंदिरासमोरील हॉटेल वृंदावन याठिकाणी बोलावले. यावेळी तक्रारदाराकडून नेहे याला लाचेचे पैसे घेताना अटक करण्यात आली. संगमनेर शहर पोलिसात नेहे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. दीपक करांडे, पो.नि. शाम पवरे, तनवीर शेख, सतीश जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमनर यांनी कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.