विश्‍वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; स्मिथ आणि वॉर्नरचा सहभाग

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या आपल्या 15 खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची घोषणा केली असून. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्‍वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने निवड केलेल्या संघामधून पीटर हॅंड्‌सकॉंब आणि जोश हेझलवूडला डच्चू देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच बरोबर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

यावेळी संघाचे नेतृत्व ऍरोन फिंचकडे सोपवण्यात आले असून ऍलेक्‍स केरीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच बरोबर संघात जायबंदी नॅथन कुल्टर-नाइलचा देखील समावेश केला गेला आहे. त्याचबरोबर ऍश्‍टन टर्नरलाही विश्‍वचषक संघातून वगळण्यात आले आहे. नुकतीच भारताविरुद्ध झालेल्या मालिकेतील मोहाली येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात टर्नरने 84 धावांची तुफानी खेळी करत धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवला होता.

वॉर्नर आणि स्मिथच्या पुनरागमनाचा धक्‍का पिटर हॅण्डस्कोम्ब आणि जोश हेझलवूडयांना बसला असून हॅण्डस्कोम्बने पदार्पणातच शतकीय खेळीकरत आपल्यातील चुणूक दाखवून देताना जानेवारीपासून खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 43 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तरीही त्याचा संघ निवडीसाठी विचार केला गेला नसून दुखापतीमुळे हेझलवूडला आराम दिला असून ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऍशेस मालिकेच्या दृष्टीने त्याला तयार होण्यासाठी विश्रांती देण्याच्या दृष्टीने त्याची निवड करण्यात आलेली नसल्याचे ऑस्ट्रेलियन संघ व्य्वस्थापनाने नमूद केले आहे.

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ खालीलप्रमाणे :

ऍरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, ऍलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्‍सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.