नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतीचिन्हांच्या आणि भेटवस्तूंचा ई-लिलाव उद्या, शनिवारपासून करण्यात येणार आहे. हा ई-लिलाव दि. 2 ऑक्टोबर आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लिलावाबद्दल माहिती दिली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखीही उपस्थित होत्या.
लिलावामधील स्मृतीचिन्हांमध्ये उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा समावेश आहे. यापैकी अनेक वस्तू म्हणजेच पारंपरिक पोशाख, शाल, पगडी, समारंभातील तलवारी या भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. अयोध्येतील श्री राममंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती आणि नमुन्यांचा समावेश असलेल्या इतर स्मृतीचिन्हांचाही यात समावेश आहे.
यावर्षी सुमारे 1200 स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू ई-लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात, स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या वस्तू संबंधित संकेतस्थळावरही पाहता येतील, अशी माहिती जी. किशन रेड्डी यांनी दिली.
या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न देशाची जीवनवाहिनी असणाऱ्या गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या नमामि गंगे या समाजकल्याणकारी कार्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, 2019मध्ये या वस्तूंचा लोकांसाठी खुल्या बोलीद्वारे लिलाव करण्यात आला. त्यावेळी पहिल्या फेरीत 1805 भेटवस्तू आणि दुसऱ्या फेरीत 2772 भेटवस्तू लिलावात ठेवण्यात आल्या होत्या. 2021मध्ये, सप्टेंबरमध्ये देखील ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात 1348 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
हेही वाचा – गौतम अदानी बनले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती; कमालीच्या वेगाने वाढतेय संपत्ती
लालबागच्या राजाच्या वस्तू लिलावातून मिळाले “इतके’ कोटी रुपये
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी निधी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजीपाला विक्रेत्याशी गैरवर्तन
Bharat Jodo Yatra: देशातील सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत फिरतोय; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांसह 6 माजी मंत्री भाजपमध्ये करणार प्रवेश
‘पुणे क्रेडाई मेट्रो’च्या २१ व्या ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ला उत्साहात सुरवात
Narendra Modi Birthday: सर्वसामान्यांशी संबंधित 10 योजना, जाणून घ्या त्यांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला?
पत्रा चाळ प्रकरण: संजय राऊत्यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध