एसीपींनी फैलावर घेताच एपीआयला आला ऍटॅक

पुणे, दि.12- सहायक पोलीस आयुक्तांनी रागाने फैलावर घेताच सहायक पोलीस निरीक्षकास ऍटॅक आला. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी मात्र सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन राखले आहे. संबंधीत सहायक पोलीस निरीक्षक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली होती. यावेळी ते पोलीस ठाण्यातील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बातचीत करत होते. काही कर्मचाऱ्यांनी केबीनमध्ये एकटे बोलवण्यात आले होते. यावेळी एका सहायक पोलीस निरीक्षकास रागाच्या भरात त्यांनी फैलावर घेतले.

संबंधीत सहायक पोलीस निरीक्षकास अगोदरच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना साहेबांचे बोलने सहन न झाल्याने ते जागेवरच कोसळले. यानंतर मात्र संबंधतीत सहायक पोलीस आयुक्तांची पाचावर धारणा बसली. सहायक पोलीस निरीक्षकास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधीत सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही धक्‍क्‍यातून सावरले नाहीत. तर या घटनेची बाहर काठेही वाच्यता न करण्याची तंबी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.