वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतीळ परंपरा यावेळीही कायम राहणार असून इंटनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणारे अंतराळवीर अवकाशातून बजावणार आहेत.
निवडणुकीच्या काळात चार अंतराळवीर अवकाशात असणार आहेत ते सर्वजण आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत इंटनॅशनल स्पेस स्टेशनवर आपले कर्तव्य बजावण्यासाठी केट रूबिन्स हि महिला अंतराळवीर १४ ऑक्टोबरला प्रस्थान करणार आहे.
इंटनॅशनल स्पेस स्टेशनवर तिचे सर्वात प्रथम आगमन होणार आहे. त्यानंतर माईक हॉपकिन्स,व्हिक्टर ग्लोव्हर,शेनोन वॉकर हे अंतराळवीर इंटनॅशनल स्पेस स्टेशनवरदाखल होणार आहेत. हे सर्वजण अमेरिकन असल्याने आपलं मतदानाचा हक्क ते अंतराळातूनच बजावणार आहेत.
यापैकी शेनोन वॉकरने २०१० च्या निवडणुकीतही अशाच प्रकारे आपला हक्क बजावला होता मतदानाच्या दिवशी या सर्वाना निवडणूक यंत्रणेकडून इमेल पाठवण्यात येणार असून त्याला उत्तर देऊन सर्वजण मतदानाची प्रक्रिया पार पडतील.
आम्ही अमेरिकेपासूज एवढे दूर असतानाही मतदान करण्यास उत्सुक आहोत प्रत्येक अमेरिकन नागरिकाने असाच उत्साह दाखवून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवायला हवा अशी अपेक्षा केट रूबिन्सने व्यक्त केली आहे.