ऍस्ट्राझेन्काची लस ठरतेय 90 टक्‍के परिणामकारक

पुणे – ऑक्‍सफर्डने विकसित केलेली लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे ऍस्ट्राझेन्काने सोमवारी जाहीर केले. ही जागतिक साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या अनेक संस्थांच्या प्रयत्नातील हा महत्त्वाचा निष्कर्ष आहे.

ही लस ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केली असून एक अर्धा डोसनंतर महिन्याभराने एक डोस दिल्यानंतर ती 90 टक्के परिणामकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य एका पध्दतीप्रमाणे लसींचे दोन पूर्ण डोस दिल्यानंतर त्याची परिणामकारकता 62 टक्के आढळली होती. या दोन्ही पध्दतींची एकत्रित परिणामकारकता 70 टक्के होती. हा निष्कर्ष सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय आहे. ही लस दिलेल्या एकालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.

या लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेने करोनाविरुद्धच्या लढ्यात ही लस अत्यंत परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आणीबाणीवर ती तातडीने परिणामकारक ठरू शकते, असे ऍस्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिऑट म्हणाले.

आमची लस परिणामकारक असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. आमच्या एका चाचणीत हा डोस 90 टक्के परिणामकारक असल्याचा उत्साहवर्धक निष्कर्ष हाती आला आहे.

जर त्या डोसचा वापर केला तर नियोजनाप्रमाणे अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे शक्‍य होईल, आजची घोषणा ही आमच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या शेकडो कठोर परिश्रम करणारे जगभरतील बुद्धिमान संशोधक आणि शेकडो स्वयंसेवकांचे आभार मानण्यासाठी केली आहे, असे ऑक्‍सफर्डच्या या लशीच्या संशोधन विभागाचे प्रमुक ऍन्ड्रू पोलार्ड यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.