आशियाई संघटना होणार स्थापन

पुणे-  भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघास भारतीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. आता हा खेळ जागतिक स्तरावर अधिक खेळला जावा यासाठी लवकर आशियाई टेनिस व्हॉलीबॉल संघटनेची स्थापना करण्यात येईल. राज्य संघटना विकासात्मक आणि आर्थिक दृष्टीने बळकट होण्याच्या दृष्टीने यापुढे काम करण्यात येईल, असा निर्धार भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने पुण्यात झालेल्या सभेत करण्यात आला.

यावेळी 24 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेला टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, महासंघाचे चेअरमन भगवान पेद्देवाड, महासंघाचे कोषाध्यक्ष धर्मवीरसिंह जडेजा, विकास समितीचे अध्यक्ष सुरेशरेड्डी, महासंघ महासचिव डॉ. रितेश वांगवाड, राज्य कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, राज्य चेअरमन गणपतराव बालवडकर, राज्य महासचिव गणेश माळवे उपस्थित होते.

गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्‍मीर, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालॅंड, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आदी राज्यांचे राज्य सचिव उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.