fbpx

‘मन कि बात’वरुन झाला वाद

महिलेच्या तक्रारीवरुन सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी ‘मन कि बात’ या कार्यक्रमात देशी श्‍वान पाळण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यावरुन सोशल मीडियात अनेक मिम्स तसेच उलट सुलट प्रतिक्रीया उमटत आले. यासंदर्भात आनंदनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाईन दिलेल्या  प्रतिक्रीयेवर तिघांनी अश्‍लिल कॉमेंटस केली होती. याप्रकरणी महिलेने तक्रार केल्यावर रुद्रा मराठे, अमोल बाग आणि सारंग चपळगावकर यांच्याविरुध्द आयटी ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांनी फेसबुकवर चला तर भक्त मंडळी देशी कुत्री पाळायला सुरवात करा, मालकाचा आदेश आहे. कुत्र्यासोबतचे फोटो टाकायला विसरु नका अशी पोस्ट केली होती. या पोस्टवर तिघा आरोपींनी अतिशय अश्‍लिल अशा कॉमेंटस केल्या होत्या. यामुळे फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली होती. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.