भावकीच्या वादात दोन सख्ख्या भावांची हत्या; आरोपी चुलत भाऊ पसार

बीड – बीड जिल्ह्यात दोन सख्ख्या भावाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील  नागापूर खुर्दमध्ये भावकीच्या जुन्या भांडणातून चुलत भावाने दोन सख्या भावांची हत्या केली. कुऱ्हाडीचे वार करून अत्यंत निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे. या घटेनंनं जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके अशी मृत दोघा भावांची नावं आहेत. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोघांना मारहाण करुन चुलत भाऊ परमेश्वर साळुंके याने जीव घेतला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

१५ ते २० दिवसांपूर्वी राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या दोघा भावांचे परमेश्वर साळुंके याच्याशी वाद झाला होता. मात्र गावातील नागरिकांना त्यांच्यातील वाद मिटवला होता.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण यांना शिविगाळ केली होती. तसेच फोनवरून दोघा भावांना शिविगाळ केली होती. त्यामुळे त्याला जाब विचारण्यासाठी राम आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे परमेश्वर साळुंकेकडे गेले होते.

मात्र परमेशवरने रागाच्या भरात दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी भावाला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.