वाद पेटला! TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM; अधिकाऱ्यांचं निलंबन

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

याचदरम्यान, उलुबेरिया मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गौतम घोष यांच्या घरी EVM आणि VVPAT सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. त्याच्या घरी ईव्हिएम मशीन आणि व्हिव्हिपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक  दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.  ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू असल्याचा टोला मोदींनी लगावला आहे.    

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.